Jeremiah 34:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा बाबेलच्या राजाचे सैन्य यरुशलेमविरुद्ध लढत होते. यहूदातील ज्या शहरांचा पाडाव झाला नव्हता, त्यांच्याशीही बाबेलचे सैन्य लढत होते. ती शहरे म्हणजे लाखीश व अजेका ही होत. यहूदामध्ये तटबंदी असलेली फक्त ही दोनच शहरे राहिली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या वेळेस बाबेलचे सैन्य यरुशलेमेवर आणि यहूदाची उरलेली नगरे म्हणजे लाखीश व अजेका ह्यांवर चढाई करून युद्ध करीत होते; यहूदाची तटबंदी केलेली नगरे एवढीच उरली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावेळी बाबेलच्या राजाचे सैन्य यरुशलेमशी युद्ध करीत होते, यहूदीया प्रांतातील इतर नगरे—लाखीश व अजेकाह—अद्यापही टिकाव धरून होती. यहूदीयात एवढीच तटबंदी असलेली शहरे बाकी होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यावेळी बाबेलाच्या राजाचे सैन्य यरूशलेमेविरूद्ध लढत आणि यहूदातील उरलेल्या सर्व नगराविरूद्ध म्हणजे लाखीश व अजेकाशी लढत होते. यहूदामध्ये तटबंदी असलेली ही नगरे राहिली होती.