Jeremiah 35:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदावर हल्ला केल्यावर. आम्हाला यरुशलेमला जावेच लागले. आम्ही एकमेकांना म्हणालो, ‘चला, आपण यरुशलेमला गेलेच पाहिजे. तरच खास्द्यांच्या आणि अराम्यांच्या सैन्यापासून आपला बचाव होईल.’ म्हणून आम्ही यरुशलेममध्ये राहिलो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्या देशावर चालून आला तेव्हा मात्र आम्ही म्हटले, ‘खास्द्यांचे सैन्य व अराम्यांचे सैन्य ह्यांच्या भीतीस्तव चला, आपण यरुशलेमेस जाऊ.’ म्हणून आज आम्ही यरुशलेमेत राहत आहोत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जेव्हा बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरने या देशावर हल्ला केला, आम्ही म्हटले, ‘चला, बाबिलोनचे व अराम्यांपासून आपला बचाव करण्यासाठी आपण यरुशलेमला पलायन करू या.’ म्हणून आम्ही यरुशलेम येथेच राहत आलो आहोत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जेव्हा बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने देशावर हल्ला केल्यावर, आम्ही म्हणालो, खास्द्यांच्या व अराम्यांच्या सैन्यापासून आपण यरूशलेमेला निसटून जाऊ. म्हणून आम्ही यरूशलेमेमध्ये राहत आहोत.”