Jeremiah 35:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर यिर्मया रेखाब कुटुंबीयांना म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलचा देव असे म्हणतो ‘तुम्ही तुमचे पूर्वज योनादाब ह्यांच्या आज्ञा पाळल्यात. त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागलात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट केलीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यिर्मया रेखाबवंशजांना म्हणाला, “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुम्ही आपला पूर्वज योनादाब ह्याचा निर्बंध मानला व त्याच्या सर्व आज्ञा पाळल्या व त्याने आज्ञापिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही केले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग यिर्मयाह रेखाबी लोकांच्या कुटुंबाकडे वळून त्यांना म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘तुम्ही तुमचे पूर्वज यहोनादाबचे प्रत्येक बाबतीत आज्ञापालन केले व त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्या.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यिर्मया रेखाबाच्या कुटुंबियांना म्हणाला, “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव, असे म्हणतो, ‘तुम्ही आपला पूर्वज योनादाब ह्यांच्या आज्ञा ऐकल्या आणि त्या सर्व पाळल्या. जे त्याने करण्यास आज्ञापिले त्याप्रमाणे तुम्ही केले आहे.