Jeremiah 36:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याच वेळी यिर्मयाच्या शब्दातील पट बारुखने वाचून दाखविला. त्याने तो परमेश्वराच्या मंदिरात वाचून दाखविला. हा पट वाचताना बारुख गमऱ्याच्या घरच्या चौकातील खोलीत होता. ही खोली मंदिराच्या ‘नवीन प्रवेशद्वारा’ जवळ होती. गमऱ्या शाफानचा मुलगा होता. गमऱ्या मंदिरातील लेखनिक होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या नवीन द्वाराच्या देवडीजवळ वरच्या चौकातील शाफानाचा पुत्र गमर्या लेखक ह्याच्या दिवाणखान्यात बारुखाने परमेश्वराच्या मंदिरात, ग्रंथात लिहिलेली यिर्मयाची वचने सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शाफानचा पुत्र गमर्याह चिटणीस, याच्या याहवेहच्या मंदिरात वरच्या सभागृहाच्या बाजूस नव्या द्वारातील प्रवेशमार्गाजवळील कचेरीमध्ये नेरीयाहचा पुत्र बारूख यिर्मयाहची वचने लिहिलेले हे चर्मपत्र वाचण्यासाठी गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा बारूखाने मोठ्याने यिर्मयाची गुंडाळीवरील वचने परमेश्वराच्या घरात शाफान लेखकाचा मुलगा गमऱ्या याच्या खोलीत, वरील अंगणात, नव्या दाराच्या प्रवेशाजवळ सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचली.