Jeremiah 36:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून तू परमेश्वराच्या मंदिरात जावेस असे मला वाटते. उपवासाच्या दिवशी तेथे जा आणि लोकांना पट वाचून दाखव. मला आलेले परमेश्वराचे संदेश मी तुला सांगितले व ते तू लिहून घेतलेस. ते तू सर्व लोकांना वाचून दाखव. यहूदाच्या शहरांतून यरुशलेममध्ये आलेल्या सर्व लोकांना तू ते संदेश वाचून दाखव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून तू जा व माझ्या तोंडची जी परमेश्वराची वचने तू पटावर लिहिली ती उपवासाच्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखव; तसेच यहूदाच्या नगरांतून येणार्‍या सर्वांच्या कानी पडतील अशी ती वाचून दाखव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून उपवासाच्या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जा आणि मी सांगून तू चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने वाचून दाखव. त्या दिवशी यहूदीया प्रांताच्या नगरांतून आलेल्या सर्व लोकांना वाचून दाखव.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून तू जा आणि मी सांगितल्याप्रमाणे तू जे पटावर लिहीले ते वाच. परमेश्वराच्या मंदिरात उपवासाच्या दिवशी, लोकांस ऐकू येतील आणि यहूदा नगरांतून आलेल्या सर्व लोकांस ऐकू येतील अशी वाचून दाखव.