Jeremiah 37:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण यिर्मयाला यरुशलेमच्या बन्यामीन प्रवेशद्वाराजवळ जाताच, तेथील पहारेकऱ्यांच्या प्रमुखाने त्याला अटक केले. त्या प्रमुखाचे नाव इरीया होते. इरीया शलेम्याचा मुलगा होता. व शलेम्या हनन्याचा मुलगा होता. इरीयाने यिर्मयाला अटक केले व तो म्हणाला, “यिर्मया, तू आम्हाला सोडून खास्द्यांच्या बाजूला जात आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो बन्यामिनाच्या वेशीत प्रवेश करतो तर तेथे पहारेकर्यांचा नायक इरीया बिन शलेम्या बिन हनन्या होता; त्याने यिर्मया संदेष्ट्याला पकडून म्हटले, “तू खास्द्यांकडे फितूर होऊन जात आहेस.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तो बिन्यामीन वेशीतून बाहेर जात असता, हनन्याहचा नातू, शेलेम्याहचा पुत्र इरीयाह या पहारेकर्याच्या प्रमुखाने त्याला पकडले व यिर्मयाह संदेष्ट्याला म्हणाला, “तू बाबेलच्या सैन्यास फितूर झाला आहेस!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो जसा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहताच, तेथे पहारेकऱ्यांचा प्रमुख होता. तेव्हा हनन्याचा मुलगा शलेम्या याचा मुलगा इरीया त्याचे नाव होते. त्याने यिर्मया संदेष्ट्याला धरले व म्हणाला, “तू फितून खास्द्यांकडे जात आहेस.”