Jeremiah 37:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग सिद्कीया राजाने यिर्मयाला बोलाविणे पाठविले आणि त्याला राजावाड्यात आणले. सिद्कीया एकांतात यिर्मयाशी बोलला. त्याने यिर्मयाला विचारले, “परमेश्वराकडून काही संदेश आला आहे का?” यिर्मयाने उत्तर दिले, “हो! परमेश्वराकडून संदेश आला आहे. सिद्कीया, तुला बाबेलच्या राजाच्या स्वाधीन केले जाईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग सिद्कीया राजाने त्याला बोलावून आणले; तेव्हा राजाने आपल्या राजवाड्यात त्याला एकान्ती विचारले की, “परमेश्वराकडचे काही वचन आहे काय?” यिर्मया म्हणाला, “आहे.” मग तो म्हणाला, “आपणांला बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला मुक्त केले व राजवाड्यात आणले, आणि खाजगीरित्या विचारले, “याहवेहकडून काही वचन आले आहे काय?” यिर्मयाह उत्तरला, “होय, तुम्हाला बाबेलच्या राजाच्या हातात सोपविण्यात येणार.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग सिद्कीया राजाने कोणाला तरी बोलाविणे पाठवून त्यास राजावाड्यात आणले. त्याच्या घरात राजाने एकांतात त्यास विचारले, “परमेश्वराकडून काही वचन आहे का?” यिर्मया म्हणाला, “आहे, व पुढे म्हणाला, तुला बाबेलाच्या राजाच्या हाती दिले जाईल.”