Jeremiah 37:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून सिद्कीया राजाने यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या चौकात ठेवण्याचा हुकूम दिला व यिर्मयाला रस्त्यावरील रोटीवाल्याकडून रोटी द्यावी असे ही सांगितले. नगरातील रोट्या संपेपर्यंत यिर्ममाला रोटी दिली गेली. अशा रीतीने यिर्मयाल चौकात पहारेकऱ्याच्या नजरेखाली राहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग सिद्कीया राजाच्या आज्ञेने त्यांनी यिर्मयाला पहारेकर्यांच्या चौकात ठेवले आणि नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत भटारआळीतून रोज त्याला एक भाकर मिळत असे. ह्याप्रमाणे यिर्मया पहारेकर्यांच्या चौकात राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावर यिर्मयाहला अंधारकोठडीत पाठवू नये, तर त्याऐवजी राजवाड्यातील तुरुंगात ठेवावे, आणि शहरात भाकरीचा पुरवठा संपेपर्यंत, त्याला रोज एक ताजी भाकर देण्यात यावी, असा सिद्कीयाह राजाने हुकूम दिला. त्याप्रमाणे यिर्मयाहला राजवाड्यातील पहारेकरांच्या अंगणात ठेवण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून सिद्कीया राजाने हुकूम दिला. त्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणात ठेवले. नगरातील सर्व भाकर संपेपर्यंत त्यास रस्त्यावरील रोटीवाल्याकडून भाकर द्यावी. अशा रीतीने यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात राहिला.