Jeremiah 37:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजा सिद्कीयाने यहूकल व याजक सफन्या ह्यांना आपला निरोप देऊन यिर्मया संदेष्ट्याकडे पाठविले, यहूकल शलेम्याचा व याजक सफन्या मासेयाचा मुलगा होता. त्यांनी यिर्मयासाठी आणलेला निरोप असा होता “यिर्मया, आमच्यासाठी परमेश्वर देवाजवळ प्रार्थना कर.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा सिद्कीया राजाने शलेम्याचा पुत्र यहूकल व मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मया संदेष्ट्याकडे सांगून पाठवले की, “आमच्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे प्रार्थना कर.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीपण सिद्कीयाह राजाने शेलेम्याहचा पुत्र यहूकल व मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक यांना यिर्मयाह संदेष्ट्याकडे अशी विनंती करण्यास पाठविले: “तू आमच्यासाठी आमचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे प्रार्थना कर.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून राजा सिद्कीयाने शलेम्याचा मुलगा यहूकल व मासेया याजकाचा मुलगा सफन्या ह्यांना पाठवून यिर्मया संदेष्ट्याकडे निरोप सांगितला. ते म्हणाले, “तू, आमच्यावतीने परमेश्वर आमचा देव याच्याजवळ प्रार्थना कर.”