Jeremiah 37:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नेमके ह्याच वेळी मिसर देशातून फारोचे सैन्य यहूदाकडे आले. यरुशलेम जिंकून घेण्यासाठी खास्द्यांच्या सैन्याने त्या नगरीला वेढा घातला होता. त्यांच्यावर मिसरचे सैन्य चालून येत आहे हे त्याने ऐकले. म्हणून मिसरच्या सैन्याशी दोन हात करण्यासाठी खास्द्याच्या सैन्याने यरुशलेम सोडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या समयी मिसर देशातून फारोचे सैन्य आले; ही वार्ता ऐकून यरुशलेमेस वेढा घालणारे खास्दी यरुशलेम सोडून गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इजिप्तच्या फारोहच्या सैन्याने इजिप्तमधून कूच केले आहे, ही बातमी जेव्हा बाबेल्यांनी ऐकली, तेव्हा त्यांनी यरुशलेमच्या वेढ्यापासून माघार घेतली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिसरातून फारोचे सैन्य बाहेर आले आणि ज्या खास्द्यांनी यरूशलेमला वेढा घातला होता त्यांनी हे वर्तमान ऐकले आणि यरूशलेम सोडून गेले.