Jeremiah 38:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण सिद्कीया राजाने गुप्तपणे शपथ घेतली. सिद्कीया म्हणाला, परमेश्वराने आम्हाला जीव व जीवन दिले. परमेश्वर नक्कीच आहे म्हणून मी वचन देतो की यिर्मया मी तुला मारणार नाही. तुला मारु इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात मी तुला देणार नाही, असेही मी तुला वचन देतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सिद्कीयाने गुप्तपणे यिर्मयाला प्रतिज्ञापूर्वक म्हटले, “आमचा जीव ज्याने उत्पन्न केला त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी तुला जिवे मारणार नाही व तुझा प्राण घेऊ पाहणार्या ह्या लोकांच्या हाती तुला देणार नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा सिद्कीयाह राजाने यिर्मयाहला त्याचे उत्पन्नकर्ता, सर्वसमर्थ याहवेह, यांची गुप्तपणे शपथ वाहिली: “मी तुला ठार मारणार नाही किंवा तुझा जीव घेऊ पाहणार्यांच्या हाती तुला देणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण सिद्कीया राजाने गुप्तपणे यिर्मयाकडे शपथ घेतली व म्हणाला, परमेश्वर ज्याने आमचा जीव उत्पन्न केला, तो जिवंत आहे, मी तुला मारणार नाही किंवा जी मनुष्ये तुझा जीव घ्यायला पाहतात त्यांच्या हातात मी तुला देणार नाही.