Jeremiah 38:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर हा इस्राएलचा देव आहे. तोच म्हणतो ‘तुम्ही जर बाबेलच्या राजाला शरण गेलात, तर तुमच्या जिविताचे रक्षण होईल. यरुशलेम जाळले जाणार नाही. तू आणि तुझे कुटुंबीयही जगाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “परमेश्वर, सेनाधीश देव, इस्राएलाचा देव म्हणतो, तू बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे गेलास तर तुझा जीव वाचेल व हे नगर अग्नीने जाळण्यात येणार नाही; तू व तुझे घराणे वाचेल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग यिर्मयाह सिद्कीयाहला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: तुम्ही बाबेलच्या राजाला शरण गेलात तर तुमचा जीव वाचेल आणि हे शहर जाळण्यात येणार नाही; तुम्ही व तुमचे घराणे जगेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “परमेश्वर, सेनाधीश देव, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, जर तू बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेलास तर तू मग जिवंत राहशील आणि हे नगर जाळले जाणार नाही. तू आणि तुझा परीवार जिवंत राहील.