Jeremiah 38:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “खास्द्यांच्या सैन्याला जाऊन मिळालेल्या यहूदाच्या लोकांची मला भीती वाटते. सैनिक मला त्या यहूदाच्या लोकांच्या ताब्यात देतील व ते लोक माझ्याशी अत्यंत वाईट वागतील, मला मारतील म्हणून मी घाबरतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “जे यहूदी फितून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते की ते मला त्यांच्या स्वाधीन करून माझा उपहास करतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावर राजा सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “मला पुढे बाबेलला गेलेल्या यहूद्यांची भीती वाटते, कारण बाबिलोनचे लोक मला यहूद्यांच्या हाती देतील व ते माझे हाल करतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “पण जे यहूदी सोडून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते, कारण ते मला त्यांच्या हाती देतील, माझी चेष्टा करतील व मला वाईट वागवतील”