Jeremiah 38:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यिर्मयाला त्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीत टाकले हे एबद-मलेख याने ऐकले. एबद-मलेख कुश देशाचा होता. तो राजाच्या पदरी एक प्रतिहारी म्हणून होता. सिद्कीया राजा बन्यामीनच्या प्रवेशद्वाराशी बसला होता. म्हणून एबद-मलेख राजवाड्यातून निघाला आणि राजाशी बोलण्यासाठी त्या प्रवेशद्वाराजवळ गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी यिर्मयाला विहिरीत टाकले असे राजगृहातला कूशी खोजा एबद-मलेख ह्याने ऐकले; त्या प्रसंगी राजा बन्यामिनी वेशीत बसला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यिर्मयाहला राजवाड्यातील अंधार विहिरीत टाकले आहे, हे वृत्त यरुशलेमच्या राजवाड्यातील एबेद-मेलेख नावाच्या एका प्रमुख अधिकार्‍याने ऐकले. तो कूशी देशाचा मूळ रहिवासी होता. यावेळी राजा बिन्यामीन वेशीपाशी बसला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता राजाच्या घरात एबद-मलेख हा एक कुशी षंढ होता. त्यांनी यिर्मयाला पाण्याच्या टाकीत टाकले आहे हे त्याने ऐकले. त्यासमयी राजा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराशी बसला होता.