Jeremiah 39:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मंदिराच्या चौकात, यहूदाच्या राजाच्या पाहऱ्यात असलेल्या यिर्मयाला त्या लोकांनी सोडविले आणि गदल्याकडे सोपविले. गदल्या अहिकामचा व अहिकाम शाफानचा मुलगा होता. यिर्मयाला घरी पाठवावे असा गदल्याला हूकूम होता. म्हणून यिर्मयाला घरी नेले गेले व तो त्याच्या आप्तांमध्ये राहू लागला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यांनी माणसे पाठवून यिर्मयाला पहारेकर्यांच्या चौकातून काढले व घरी न्यावे म्हणून त्याला गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याच्या स्वाधीन केले; मग तो लोकांत जाऊन राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सैनिक पाठवून यिर्मयाहला पहारेकऱ्यांच्या आंगणातून बाहेर आणले व त्याला परत त्याच्या घरी नेण्यासाठी शाफानचा नातू व अहीकामचा पुत्र गदल्याह याच्याकडे सोपविले. मग यिर्मयाह देशामध्ये उरलेल्या त्याच्या लोकांमध्ये राहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या मनुष्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणातून काढले आणि शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या याने त्यास घरी न्यावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले. मग यिर्मया लोकांमध्ये राहू लागला.