Jeremiah 39:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सिद्कीया राजाने बाबेलच्या ह्या अधिकाऱ्यांना पाहिले आणि तो सैनिकांबरोबर पळून गेला. त्यांनी रात्री यरुशलेम सोडले ते राजाच्या बागेतून आणि तटबंदीच्या दोन भिंतीमधल्या दारातून बाहेर पळाले. ते वाळवंटाकडे गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे पाहून यहूदाचा राजा सिद्कीया व सर्व योद्धे ह्यांनी पलायन केले; ते रात्री राजाच्या बागेच्या वाटेने, दोहो तटांमधल्या वेशीने नगराबाहेर निघून गेले; राजा अराबाच्या मार्गाने गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे पाहताच यहूदीयाचा राजा सिद्कीयाह व त्याचे सैनिक रात्रीच्या वेळी शहर सोडले, त्यांनी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून अराबाहच्या दिशेने पळून गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे झाले की, जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया आणि त्याच्या लढाऊ मनुष्यांनी त्यांना पाहिले, ते पळून गेले. ते रात्री राजाच्या बागेच्या वाटेने नगरातून तटबंदीच्या दोन भिंतीमधल्या दारातून निघून गेले. राजा अराबाकडच्या मार्गाने निघून गेला.