Jeremiah 39:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाबेलच्या राजाच्या विशेष संरक्षकांचा प्रमुख नबूजरदान हा होता. त्याने यरुशलेममध्ये राहिलेल्या लोकांना कैद केले. व बाबेलला नेले. त्याला अगोदरच शरण आलेल्यांना त्याने कैद केले. एकंदरीत त्याने येरुशलेममधील सर्व लोकांनाच कैद केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने नगरात अवशिष्ट राहिलेले लोक आणि जे फितून त्याच्याकडे गेले होते ते आणि जे कोणी लोक शेष राहिले होते ते, अशा सर्वांना कैद करून बाबेलास नेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग गारद्यांचा सरदार नबुजरदान याने शहरात उरलेल्यांना, त्यांना पूर्वीच फितूर झालेल्या सर्वांना व शेष लोकांना बाबेलला बंदिवासात घेऊन गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान ह्याने नगरामध्ये राहिलेल्या लोकांस, जे लोक खास्द्यांना सोडून गेले होते आणि जे कोणी नगरात उरलेले लोक होते, त्यांना कैदी करून बाबेलास नेले.