Jeremiah 4:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पाहा! शत्रू ढगाप्रमाणे वर येतो. त्याचे रथ वावटळीप्रमाणे दिसतात, त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. हे सर्व आपल्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. आपला विध्वंस झाला!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाहा! तो ढगांसारखा पुढे येत आहे, चक्रीवादळाप्रमाणे त्याचे रथ आहेत, त्यांच्या घोड्यांचा वेग गरुडांहून जास्त आहे. हाय! हाय! आमचा नायनाट झाला आहे!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा! तो ढगाप्रमाणे आक्रमण करील, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत. त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्हांला हाय! कारण आम्ही लुटलेले आहो.