Jeremiah 4:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अरिष्टामागून अरिष्ट येते. संपूर्ण देशाचा नाश झाला. अचानक माझ्या तंबूचा नाश झाला. कनाती फाडल्या गेल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नाशावर नाश पुकारला आहे; कारण सर्व देश लुटला आहे; माझे डेरे अकस्मात माझ्या कनाती क्षणात लुटल्या आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एका आपत्तीच्या पाठोपाठ दुसरी आपत्ती येते; सर्व राष्ट्र उद्ध्वस्त झाले आहे. माझा तंबूचा एका क्षणात नाश झाला आहे, क्षणार्धात माझे निवासस्थान जमीनदोस्त झाले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरिष्टामागून अरिष्ट घोषीत करण्यात आले आहे. कारण संपूर्ण देशाचा नाश झाला आहे. एकाएकी त्यांनी माझ्या तंबूचा व कनातींचा नाश केला आहे.