Jeremiah 4:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यहूदाच्या लोकांना हा संदेश द्या. यरुशलेममधील प्रत्येकाला सांगा: ‘सर्व देशभर रणशिंगे फुंका, मोठ्याने ओरडून सांगा, “एकत्र या. सुरक्षिततेसाठी आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदात पुकारा, यरुशलेमेत जाहीर करा, आणि म्हणा की, “देशात रणशिंग फुंका; जोराने ओरडून म्हणा, ‘एकत्र व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात जाऊ.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“यहूदीयात याची घोषणा करा आणि यरुशलेमात जाहीर करा व सांगा: ‘संपूर्ण राष्ट्रांत रणशिंगे फुंका!’ मोठ्याने ओरडून सांगा: ‘सर्वजण एकत्र या! तटबंदीच्या नगरात शरण घ्या!’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“यहूदाच्या लोकांस ही वार्ता कळवा आणि यरूशलेमला हे ऐकू जाऊ द्या: ‘देशात रणशिंगे फुंका, घोषीत करा, एकत्र या. आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या.’