Jeremiah 4:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणतो, “हे घडत असताना, राजा आणि त्याचे अधिकारी यांचा धीर सुटेल, याजक घाबरतील, संदेष्ट्यांना धक्का बसेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजाचे व सरदारांचे काळीज ठाव सोडील; याजकांची त्रेधा उडेल आणि संदेष्टे भयचकित होतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह असे म्हणतात, “त्या दिवशी असे घडेल,” “राजा आणि अधिकारी भीतीने गर्भगळीत होतील, याजकांना भयाने धडकी भरेल आणि संदेष्टे भीतीने गांगरून जातील,”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“आणि परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजांचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे हृदय मरून जाईल, याजक घाबरतील आणि संदेष्टे भयभीत होतील.”