Jeremiah 40:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यिर्मयाची रामा येथे, सुटका झाल्यावर परमेश्वराकडून संदेश आला. बाबेलच्या राजाच्या खास सैनिकांचा प्रमुख नबूजरदान ह्याला रामा शहरात यिर्मया सापडला. यिर्मयाला बेड्या घातल्या होत्या. यरुशलेम व यहूदा येथील सर्व कैद्यांबरोबरच तो होता. त्या सर्वांना कैद करुन बाबेलला नेले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने यरुशलेम व यहूदा ह्यांतील जे लोक बंदिवान करून बाबेलास नेले त्या सर्वांबरोबर यिर्मयालाही बेड्या घालून रामा येथे आणले होते; तेथे त्याने यिर्मयाची सुटका केल्यानंतर यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याला, बाबिलोन येथे बंदिवासात यरुशलेम व यहूदीया येथील जे लोक पाठविले जाणार होते, त्यांच्याबरोबर यिर्मयाह साखळदंडात बांधलेला आढळला. तेव्हा त्याने त्याला रामाह येथे नेले, त्याची सुटका केली. यानंतर यिर्मयाहला याहवेहचे वचन आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरूशलेम व यहूदा येथील जे सर्व कैदी बंदिवान करून बाबेलास नेले होते त्यांच्यामध्ये यिर्मया बेड्यांनी बांधलेला होता. तेव्हा राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने त्यास रामा येथून पाठवून दिल्यावर जे वचन परमेश्वराकडून यिर्मयाकडे आले ते हे.