Jeremiah 40:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाबेलच्या राजाने यहूदातील काही लोकांना त्यांच्या स्वत:च्या देशात राहू दिले आहे हे मवाब, अम्मोन, अदोम व इतर देशात राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांना समजले. ह्या मागे राहिलेल्या लोकांसाठी शाफानपुत्र अहीकाम याचा मुलगा गदल्या ह्यास बाबेलच्या राजाने, राज्यपाल म्हणून नेमले असल्याचेही त्यांना कळले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये, अदोमात व इतर सर्व देशांत जे यहूदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलच्या राजाने यहूदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्यांच्यावर गदल्या बिन अहीकाम बिन शाफान नेमला आहे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीया प्रांतामध्ये अजून काही लोक उरले आहेत, बाबेलच्या राजाने सर्वांनाच कैद करून नेले नाही व शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याह हा राज्यपाल म्हणून नियुक्त झाला आहे, असे मोआब, अम्मोन, एदोम, या प्रांतात व आजूबाजूच्या देशात असलेल्या यहूद्यांनी ऐकले, तेव्हा
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये, अदोमात व इतर सर्व देशात जे यहूदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलाच्या राजाने यहूदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्यांच्यावर गदल्या बिन अहीकाम बिन शाफान नेमला आहे,