Jeremiah 40:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही बातमी कळताच यहूदाचे लोक यहूदात परतले ते सर्व ज्या ज्या देशांत पसरले गेले होते, तेथून ते गदल्याकडे मिस्पाला परतले, ते परत आले व त्यांनी द्राक्षरस व ग्रीष्मातील फळे यांचा पुष्कळ साठा केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ज्या ज्या ठिकाणी त्यांना हाकून दिले होते तेथून सर्व यहूदी परत यहूदा देशात मिस्पा येथे गदल्याकडे आले व त्यांनी द्राक्षारस व ग्रीष्म ऋतूतील फळे ह्यांचा मोठा संचय केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेही जिथे विखरून गेले होते, तिथून यहूदीया प्रांतात मिस्पाह येथे गदल्याहकडे आले. नंतर त्यांनी द्राक्षारस आणि उन्हाळी फळे या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा जे सर्व प्रत्येक ठिकाणी पांगले होते ते सर्व यहूदी परत यहूदा देशात मिस्पात गदल्याकडे आले. त्यांनी द्राक्षरस आणि उन्हाळी फळांचा हंगाम मोठ्या विपुलतेने साठा केला.