Jeremiah 41:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग कारेहचा मुलगा योहानान व इतर सर्व सैन्याधिकारी यांनी सर्व कैद्यांना सोडविले. गदल्याला ठार मारल्यानंतर इश्माएलने ह्या लोकांना मिस्पा येथून आणले होते. त्या वाचलेल्या लोकांत सैनिक, स्त्रिया, मुले व दरबारातील अधिकारी होते. योहानानने त्यांना गिबोनमधून परत आणले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग गदल्या बिन अहीकाम ह्याला मारल्यावर इश्माएल बिन नथन्या ह्याने जे योद्धे, स्त्रिया, मुले व खोजे ह्यांना धरून मिस्पा येथून नेले होते. त्यांना योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबर असलेले सैन्याचे सर्व नायक ह्यांनी मिस्पा येथे त्यांच्या हातून सोडवून गिबोनाहून परत आणले त्या सर्व अवशिष्ट लोकांना घेऊन,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग कारेहापुत्र योहानान व त्याच्यासोबत असलेल्या सेनाधिकाऱ्यांनी अहीकामचा पुत्र गदल्याहचा नथन्याहचा पुत्र इश्माएलने वध केल्यानंतर मिस्पाह इथे उरलेल्या लोकांना—सैनिक, स्त्रिया, मुले व गिबोन येथून सोडविलेले राजदरबारातील अधिकारी यांना घेऊन ते निघाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नथन्याचा मुलगा इश्माएल याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला जिवे मारल्यावर लोकांतले जे सर्व राहिलेले मिस्पा येथून नेले होते, जे कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी सर्वांना सोडविले. गिबोनाहून योहानाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बलवान माणसे, लढणारे माणसे, स्त्रिया व मुले आणि षंढ यांना सोडवले.