Jeremiah 41:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इश्माएलने मिस्पा सोडले व तो त्या माणसांना भेटायला गेला. तो त्यांना भेटायला जाताना रडला. तो त्या माणसांना म्हणाला, “अहीकामचा मुलगा गदल्या ह्याला भेटण्यास माझ्याबरोबर चला.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इश्माएल बिन नथन्या हा मिस्पा येथून त्यांना सामोरा गेला; तो वाटेने रडत गेला. त्यांची भेट झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे चला.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नथन्याहचा पुत्र इश्माएल रडत त्यांना भेटण्यासाठी मिस्पाह शहरातून निघाला व म्हणाला “चला! आपण अहीकामचा पुत्र गदल्याहची भेट घेऊ.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा नथन्याचा मुलगा इश्माएल त्यांना भेटायला मिस्पातून जसे ते गेले, चालत व रडत गेले. नंतर असे झाले की, जसा त्यांच्याशी सामना होताच, तो त्यांना म्हणाला, “अहीकामाचा मुलगा गदल्या याच्याकडे या.”