Jeremiah 41:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती 80 माणसे मिस्पाला गेली. इश्माएलने व त्याच्या माणसांनी त्यातील 70 जणांना मारले. आणि त्यांची प्रेते खूप खोल असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते शहराच्या मध्यभागी आल्यावर असे झाले की इश्माएल बिन नथन्या ह्याने व त्याच्या साथीदारांनी त्यांना जिवे मारून विहिरीत फेकून दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग ते सर्वजण शहराच्या आत आल्यावर, नथन्याहचा पुत्र इश्माएल व त्याची माणसे यांनी त्यांच्यापैकी दहा जणांना सोडून बाकी सर्वांना जिवे मारले व त्यांची प्रेते एका विहिरीत टाकली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग असे झाले की, जेव्हा ते नगराच्या मध्ये आले असता नथन्याचा मुलगा इश्माएल याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी त्यांची कत्तल करून आणि त्यांना खड्ड्यात फेकून दिले.