Jeremiah 42:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जर तुम्ही यहूदात राहिलात, तर मी तुमचा नाश करणार नाही. उलट मी तुम्हाला सामर्थ्यशाली करीन. मी तुम्हाला रुजवीन, उपटून टाकणार नाही. मी असे करण्याचे कारण म्हणजे तुमच्यावर मला आणाव्या लागलेल्या वाईट प्रसंगामुळे मला वाईट वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या देशात अजूनही तुम्ही राहाल तर मी तुम्हांला उभारीन, पाडून टाकणार नाही; तुमची लावणी करीन, उपटून टाकणार नाही; कारण मी तुमचे अनिष्ट केले ह्याचा मला अनुताप होत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘तुम्ही जर याच देशात राहिलात तर मी तुम्हाला उभारेन आणि तुम्हाला उद्ध्वस्त करणार नाही; मी तुम्हाला रोपीन, आणि उपटून टाकणार नाही, कारण तुमच्यावर अरिष्ट आणल्याचा मला अनुताप होत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तुम्ही परत गेला नाही आणि या देशात राहिला तर मी तुम्हास बांधीन आणि तुम्हास खाली पाडणार नाही; मी तुम्हास लावीन, उपटून टाकणार नाही, कारण जे अरिष्ट मी तुमच्यावर आणले त्यामुळे मला वाईट वाटते.