Jeremiah 42:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही तुमच्या मृत्यूला कारण होईल, अशी चूक करीत आहात तुम्ही मला परमेश्वराकडे, तुमच्या देवाकडे, पाठविले तुम्ही मला म्हणाला, ‘आमच्यासाठी आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना कर. परमेश्वराने करायला सांगितलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला सांग आम्ही परमेश्वराचे ऐकू.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे तुम्ही आपला जीव धोक्यात घातला आहे; कारण परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे मला पाठवून तुम्ही म्हटले की, ‘परमेश्वर आमचा देव ह्याची आमच्यासाठी प्रार्थना कर व परमेश्वर आमचा देव सांगेल ते सर्व आम्हांला कळव म्हणजे त्याप्रमाणे आम्ही करू.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही ही भयानक चूक केली आहे, तुम्हीच मला याहवेह, तुमच्या परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी पाठविले होते व सांगितले की आमच्या याहवेह परमेश्वराकडे प्रार्थना करून ते काय म्हणतात ते सर्व आम्हाला सांग, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे करू.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण परमेश्वर आमचा देव याच्याजवळ आम्हासाठी प्रार्थना करा, आणि जे काही परमेश्वर आमचा देव सांगेल ते आम्ही करू असे बोलून परमेश्वर तुमचा देव याच्याकडे मला पाठवले तेव्हा तुम्ही आपल्या जिवाविरूद्ध कपटाने वागला.