Jeremiah 42:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग ते लोक यिर्मयाला म्हणाले, “जर परमेश्वर देव तुझ्याकडून जसे सांगतो तसे आम्ही वागलो नाही, तर तुझा परमेश्वर देवच आमच्याविरुद्धचा खरा व प्रामाणिक साक्षीदार असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते यिर्मयाला म्हणाले, “परमेश्वर आपला देव आपल्या हस्ते जे वचन आम्हांला सांगून पाठवील त्या सर्वांप्रमाणे आम्ही न केले तर परमेश्वर आमच्याविरुद्ध खरा विश्वसनीय साक्षी असो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावर ते यिर्मयाहला म्हणाले, “आम्हाला याहवेह जे करावयास सांगतील, ते आम्ही करण्याचे नाकारले, तर याहवेह आमचे परमेश्वर आमच्याविरुद्ध सत्य व विश्वसनीय साक्षीदार असतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ते यिर्मयाला म्हणाले, “जर परमेश्वर देव तुझ्याकडून जसे सांगतो तसे आम्ही वागलो नाही, तर परमेश्वर तुझा देव आमच्याविरूद्ध खरा व प्रामाणिक साक्षीदार होवो.