Jeremiah 43:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशा रीतीने यिर्मयाने परमेश्वराकडून, त्यांच्या देवाकडून आलेला संदेश लोकांना सांगितला. परमेश्वराने लोकांना सांगण्यास सांगितलेली प्रत्येक गोष्ट यिर्मयाने लोकांना ऐकविली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग असे झाले की परमेश्वर त्यांचा देव ह्याने जी वचने यिर्मयाच्या हस्ते लोकांकडे पाठवली ती सर्व त्या सर्वांना सांगण्याचे यिर्मयाने संपवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा यिर्मयाहने याहवेहचे वचन सर्व लोकांना सांगणे संपविले—जे सर्व त्यांना सांगण्यास याहवेह त्यांचे परमेश्वर यांनी त्याला पाठविले होते—तेव्हा
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे घडले की, यिर्मयाने परमेश्वर जो त्यांचा देव याने लोकांस सांगण्यास दिलेली सर्व वचने सांगून समाप्त केली.