Jeremiah 43:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग हे सर्व पाहत असलेल्या यहूदी लोकांना सांग ‘सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सर, यास येथे पाठवीन, तो माझा सेवक आहे. मी पुरलेल्या ह्या दगडांवर मी त्याचे सिंहासन ठेवीन, तो ह्या दगडावर त्याचे छत्र उभारील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी बाबेलचा राजा, माझा सेवक नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणीन व हे जे धोंडे मी लपवून ठेवले आहेत त्यांवर त्याचे सिंहासन ठेवीन; मग तो त्यांवर आपला भव्य गालिचा पसरील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि मग त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला इजिप्तमध्ये पाठवेन. मी त्याचे सिंहासन याच लपविलेल्या धोंड्यावर स्थापन करेन; मग तो त्यावर आपला राजमंडप पसरेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्यांना सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, पाहा, मी बाबेलाचा राजा, नबुखद्नेस्सर, माझा सेवक याला येथे निरोप्या पाठवून बोलावून घेईन. यिर्मया तू या पुरलेल्या धोंड्यावर मी त्याचे सिंहासन स्थापीन, नबुखद्नेस्सर त्यावर आपला भव्य गालीचा पसरवील.