Jeremiah 43:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो मिसरच्या दैवतांच्या देवळांना आग लावील. तो देऊळे जाळील व मूर्ती काढून नेईल. मेंढपाळ ज्याप्रमाणे त्याच्या कपड्यावरील पिसवा व काटे ओढून काढून आपले कपडे स्वच्छ करतो, त्याप्रमाणे नबुखद्नेस्सर मिसर साफ करील. मग तो निर्धास्तपणे मिसर सोडून जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिवाय मी मिसरी दैवतांच्या गृहात अग्नी पेटवीन; तो राजा त्यांना जाळील व बंदिवान करून नेईल; मेंढपाळ आपले अंग जसे वस्त्राने वेष्टतो तसा तो मिसर देशाने स्वतःस वेष्टील व शांतीने तेथून निघून जाईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो इजिप्तच्या दैवतांच्या मंदिरांना आग लावील; तो त्यांची मंदिरे जाळून त्यांच्या मूर्ती ताब्यात घेईल. एखादा धनगर आपल्या अंगरख्यातील पिसवा वेचून स्वच्छ करतो, त्याप्रमाणे तो इजिप्त देशातील सर्व वेचूनवेचून लुटून नेईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी मिसराच्या देवांच्या मंदिरांना आग लावील. नबुखद्नेस्सर त्यांना जाळील किंवा त्यांना बंदीवान करून नेईल. मेंढपाळ ज्याप्रमाणे त्याच्या कपड्यावरील पिसवा ओढून काढून आपले कपडे स्वच्छ करतो, त्याप्रमाणे तो मिसर देश साफ करील. तो विजयाने त्या जागेतून जाईल.