Jeremiah 44:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यरुशलेम नगरीवर व यहूदाच्या इतर नगरांवर मी जी भयंकर संकटे आणली, ती तुम्ही पाहिलीत. आता ती नगरे म्हणजे नुसती दगडधोंड्यांची रास झाली आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मी यरुशलेमेवर व यहूदाच्या सर्व नगरांवर जे अरिष्ट आणले ते सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे; पाहा, आज ती उजाड व निर्जन झाली आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: यरुशलेम व यहूदीयाची सर्व नगरे यांच्यावर मी कसा विनाश आणला, ते तुम्ही पाहिले आहे. ते आता टाकलेल्या लोकागत भग्नावशेषात निवास करतात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, यरूशलेम व यहूदाच्या सर्व नगरांवर जे अरिष्ट मी आणली, ते तुम्ही पाहिली आहेत. पाहा, आता ती नगरे उजाड झाली आहेत. तेथे राहण्यास कोणीही जिवंत नाही.