Jeremiah 44:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांनो परमेश्वराचा संदेश ऐका मी माझ्या महान नावाची शपथ घेऊन वचन देतो की मिसरमध्ये राहणाऱ्या यहूदी लोकांपैकी कोणीही पुन्हा कधीही वचन देताना, माझी शपथ घेणार नाहीत ते पुन्हा कधीही “देवा शपथ.” असे म्हणणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरीपण यहूदातले जे सर्व तुम्ही मिसर देशात राहत आहात ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका: परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आपल्या थोर नामाची शपथ वाहिली आहे की अखिल मिसर देशात, ‘परमेश्वराच्या जीविताची शपथ,’ असे म्हणायला माझे नाम यहूदातल्या माणसांपैकी कोणाच्या मुखातून निघणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीपण इजिप्त देशात राहणार्या सर्व यहूद्यांनो, याहवेहचे वचन ऐका: ‘मी आपल्या थोर नामाची शपथ घेत आहे, याहवेह म्हणतात, इजिप्त देशात राहणारे कोणीही यहूदीयाचे नागरिक “सार्वभौम याहवेहच्या नावाची शपथ.” असे कधीही म्हणणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव जे तुम्ही यहूदी देशातले मिसर देशात राहता ते सर्व तुम्ही परमेश्वराची वचने ऐका; पाहा, मी आपल्या थोर नावाची शपथ वाहिली आहे की, सर्व मिसर देशामध्ये राहणाऱ्या यहूदा देशातल्या कोणत्याही मनुष्याच्या मुखाने परमेश्वर जिवंत आहे असे म्हणून माझे नाव पुन्हा घेण्यात येणार नाही.