Jeremiah 44:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेथे राहणाऱ्या लोकांनी पाप केल्यामुळे मी त्यांचा नाश केला. त्यांनी अनेक दैवतांना बळी अर्पण केले. त्यामुळे मला राग आला. तुमच्या लोकांनी व पूर्वजांनी, पूर्वी कधी, त्या दैवतांना पुजले नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी जाऊन धूप जाळला व त्यांना, तुम्हांला व तुमच्या वडिलांनाही अज्ञात असलेल्या अशा अन्य देवांची सेवा त्यांनी केली; असा दुष्टपणा करून त्यांनी मला चिडवले म्हणून असे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी केलेल्या दुष्टाईमुळेच असे झाले. त्यांनी इतर दैवतांना धूप जाळला व त्यांची आराधना केली म्हणून माझा क्रोध त्यांच्यावर भडकला. अशी दैवते जी त्यांना किंवा तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांनाही माहीत नव्हती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण हे त्यांच्या स्वतःचे नाहीत किंवा तुम्हास किंवा तुमच्या पूर्वजांना माहित नाहीत अशा दुसऱ्या देवांना धूप जाळून आणि त्यांची उपासना करण्यासाठी जाऊन वाईट गोष्टी करून त्यांनी माझे मन दुःखावले.
Recommended Reading