Jeremiah 44:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मूर्तीची पूजा करीत राहून तुम्ही स्वत:लाच इजा का करुन घेत आहात? तुम्ही पुरुष व स्त्रिया, मुले व बाआलके यांना यहूदाच्या कुळापासून तोडत आहात. त्यामुळे यहूदाच्या कुळातील कोणीही शिल्लक राहणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव आता सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो: तुम्ही आपल्या हातच्या कर्मांनी मला चिडवावे आणि यहूदातले तुमचे पुरुष, स्त्रिया, बालके व तान्ही ह्यांचा उच्छेद होऊन तुमच्यातला कोणी शिल्लक राहू नये, असे आपल्या जिवावर का अरिष्ट आणता?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आता सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही स्वतःवर विनाश आणला. यहूदीयातील तुमचे पुरुष, स्त्री, अथवा लेकरे व तान्हीमुले देखील वाचणार नाहीत व तुमचे कोणीही अवशेष राहणार नाहीत असे तुम्ही का करीत आहात?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून आता, सेनाधीश परमेश्वर आणि इस्राएलाचा देव असे म्हणतो, “तुम्ही आपल्या स्वत:विरूद्ध हे मोठे अनिष्ट का करता? तुम्ही आपणासाठी पुरुष व स्त्रिया, मुले व बालके यांना यहूदापासून तोडण्याचे कारण का होता? तुमचा अवशेष उरणार नाही.