Jeremiah 44:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? यहूदाच्या राजा राण्यांनी केलेली वाईट कृत्ये तुम्हाला आठवत नाहीत का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदात व यरुशलेमच्या रस्त्यावर केलेली पापे तुम्ही विसरलात का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदा देशात व यरुशलेमेच्या आळ्याआळ्यांतून केलेली तुमच्या पूर्वजांची दुष्कृत्ये, यहूदाचे राजे व त्यांच्या स्त्रिया ह्यांची दुष्कृत्ये, तुमची स्वतःची व तुमच्या स्त्रियांची दुष्कृत्ये, ह्यांचा तुम्हांला विसर पडला काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही तुमच्या पूर्वजांनी केलेली पापे, यहूदीयाचे राजे व राण्यांनी केलेली पापे, यहूदीया नगरात व यरुशलेमच्या रस्त्यावर तुम्ही व तुमच्या स्त्रियांनी केलेली पापे, ही सर्व विसरला काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये आणि यहूदा राजा व त्याच्या बायकांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदाच्या देशात व यरूशलेमेच्या रस्त्यावर केलेली वाइट कृत्ये विसरलात का?