Jeremiah 46:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पण त्या वेळी, आमच्या प्रभूचा, सर्वशक्तिमान परमेश्वराचाच जय होईल. तो त्यांना योग्य ती शिक्षा करील. परमेश्वराच्या शत्रूंना योग्य अशीच शिक्षा मिळेल. सर्वनाश होईपर्यंत तलवार वार करील. तलवारीला लागलेली रक्ताची तहान भागेपर्यंत ती लोकांना ठार करील. आमच्या प्रभूला, सर्वशक्तिमान परमेश्वराला बळी मिळावा म्हणून असे घडेल. हा बळी म्हणजे फरात नदीच्या काठी उत्तरेच्या प्रदेशात असलेले मिसरचे सैन्य होय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचा आहे, आपल्या शत्रूंवर सूड उगवण्याचा तो दिवस आहे. तलवार खाऊन तृप्त होईल, ती त्यांचे रक्त पोटभर पिईल; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने उत्तरेच्या देशात फरात नदीच्या तीरी यज्ञ मांडला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण हा दिवस प्रभू, सर्वसमर्थ याहवेहचा आहे— हा सूड उगविण्याचा, त्यांच्या शत्रूंवर सूड उगविण्याचा दिवस आहे. रक्त पिऊन तिची तृप्ती होईपर्यंत तलवार तृप्त होईपर्यंत गिळंकृत करीत राहील. कारण प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, उत्तरेकडील फरात नदीकाठील प्रदेशात यज्ञार्पण करणार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर याने आपल्या शत्रूंचा सूड घ्यावा म्हणून तो दिवस त्यास सूड घेण्याचा दिवस होईल. तेव्हा तलवार खाऊन तृप्त होईल. ती त्यांचे भरपूर रक्त पिईल. कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वरास फरात नदीच्या काठी उत्तरेच्या देशात यज्ञ करायचा आहे.