Jeremiah 46:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इतर राष्ट्रे तुझा आक्रोश ऐकतील. सर्व पृथ्वीवर तो ऐकू जाईल. एक ‘शूर योद्धा’ दुसऱ्या ‘शूर योधध्द्याला’ भिडेल. आणि दोघेही ‘शूर योद्धे’ बरोबरच खाली पडतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राष्ट्रांनी तुझी अपकीर्ती ऐकली आहे, तुझ्या आक्रोशाने पृथ्वी भरली आहे; कारण वीराला वीर टक्कर देऊन एकत्र पडत आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राष्ट्रे तुझ्या लज्जेची वार्ता ऐकतील; तुझ्या आक्रोशाने संपूर्ण पृथ्वी भरेल. तुझे योद्धे परस्परांवर अडखळून पडतील; दोघेही एकमेकांसोबत एकत्र पडतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राष्ट्रांनी तुझी बदनामी ऐकली आहे. पृथ्वी तुझ्या विलापाने भरली आहे, कारण सैनिक सैनिकाविरूद्ध अडखळत आहेत. ते दोघेही एकत्र पडतील.”