Jeremiah 46:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा संदेश मिसर देशासाठी आहे. फारो नखो ह्याच्या सैन्याविषयी हा संदेश आहे. नखो मिसरचा राजा होता. कर्कमीश शहराजवळ त्याच्या सैन्याचा पराभव झाला. कर्कंमीश फरात नदीच्या काठी आहे. योशीयाचा मुलगा योहयाकीम यहूदाचा राजा असताना त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फारो नखोच्या सैन्याचा कर्कमीश येथे पराभव केला. परमेश्वराचा मिसरला पुढीलप्रमाणे संदेश आहे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मिसराविषयी: मिसर देशाचा राजा फारो नखो ह्याचे सैन्य कर्कमीशाजवळ फरात नदीच्या काठी होते, यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने त्या सैन्याचा निःपात केला त्याविषयी:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इजिप्तसंबंधी: योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फरात नदीजवळ कर्कमीशच्या लढाईत इजिप्तचा राजा फारोह नखो व त्याचे सैन्य यांचा पराभव केला. त्या प्रसंगी इजिप्तच्या सेनेविरुद्ध हा संदेश देण्यात आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिसरासाठीः मिसराचा राजा फारो नखो याचे जे सैन्य फरात नदीजवळ कर्कमीशात होते. योशीयाचा मुलगा यहोयाकीम यहूदाचा राजा याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने पराभव केला. त्याविषयीः