Jeremiah 46:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मिसर, फूत्कारणाऱ्या व निसटून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सापाप्रमाणे आहे. शत्रू जवळ जवळ येत आहे आणि मिसरचे सैन्य पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. शत्रू मिसरवर कुऱ्हाडीने हल्ला करतील. ते लाकूडतोड्यां प्रमाणे असतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्प सरसर चालतो तसा तिचा आवाज होतो; ते सैन्यांसह येतात; लाकूडतोड्याप्रमाणे ते तिच्यावर कुर्हाडी घेऊन येतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसे त्यांचे बलाढ्य शत्रूपुढे चाल करतील, जंगलतोड्यांगत येऊन त्यांच्यावर ते कुऱ्हाड घेऊन आक्रमण करतील. तेव्हा इजिप्त फुत्कारणाऱ्या सर्पाप्रमाणे पळ काढेल;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिसर फूत्कारणाऱ्या व दूर सरपटणाऱ्या सापासारखा आहे, कारण तिचे शत्रू तिच्याविरोधात सैन्यासह कूच करत आहेत. ते लाकूड तोड्याप्रमाणे कुऱ्हाडीसह तिच्याकडे जात आहेत.