Jeremiah 46:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “ते मिसरचे जंगल (सैन्य) तोडून टाकतील जंगलात (सैन्यात) खूप झाडे (सैनिक) आहेत. पण ती सर्व तोडली जातील. टोळापेक्षा तेथे जास्त सैनिक आहेत. कोणीही मोजू शकणार नाही एवढे सैनिक येथे आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, त्या सैन्यांचा अंदाज करता येत नाही; ते टोळांहून असंख्य आहेत, ते अगणित आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह जाहीर करतात, कितीही घनदाट असलेले जंगल ते कापून नष्ट करतील. ते टोळांपेक्षाही असंख्य असे असतील, ज्यांची संख्या मोजता येणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर असे म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, जरी ते खूप घनदाट आहे. कारण शत्रू टोळांपेक्षा असंख्य आहेत, मोजण्यास असमर्थ आहेत.