Jeremiah 46:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी ह्या सर्व लोकांचा त्यांच्या शत्रूंच्या हातून पराभव करीन. त्या शत्रूंची त्यांना मारण्याची इच्छा आहे. मी त्या लोकांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हवाली करीन.” “फार पूर्वी, मिसरला, शांतता होती. ह्या संकटकाळानंतरही मिसरला शांतता नांदेल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचा घात करू पाहणारे, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हाती मी त्यांना देईन; तरी पुढे त्यात पूर्वकालाप्रमाणे पुन्हा वस्ती होईल, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना ठार मारावे अशी इच्छा धरणारे—बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सैन्य यांच्या तावडीत मी त्यांना देईन. परंतु नंतर मात्र हा इजिप्त लढाईच्या उत्पातातून सावरेल आणि तिथे पूर्ववत वस्ती होईल, असे याहवेह जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यांना त्यांचे जीव घेऊ पाहणारे, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हाती देईन. यानंतर पूर्वीप्रमाणे मिसरात वस्ती होईल. असे परमेश्वराने सांगितले आहे.