Jeremiah 46:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “याकोब, माझ्या सेवका घाबरु नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला खूप निरनिराळ्या ठिकाणी पाठविले पण मी तुझा संपूर्ण नाश करणार नाही. इतर राष्ट्रांचा मात्र मी नाश करीन. तुझ्या दुष्कृत्यांबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून तुझ्या शिक्षेतून मी तुला सूट देणार नाही. मी तुला शिस्त लावीन हे खरे! पण ती न्याय्यपणाने लावीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणतो, माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; कारण मी तुझ्याबरोबर आहे; ज्या राष्ट्रांत मी तुला हाकून दिले आहे, त्या सर्वांचा मी सर्वस्वी नाश करीन, पण तुझा सर्वस्वी नाश करणार नाही; तरी मी तुझे योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याकोबा, माझ्या सेवका, भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे.” असे याहवेह जाहीर करतात. “मी तुला ज्या राष्ट्रांमध्ये विखरून दिले होते, त्या राष्ट्रांचा जरी नाश केला, परंतु तुझा संपूर्ण नाश करणार नाही. मी तुला शिस्त लावण्यासाठी एका मर्यादेत शिक्षा करेन. तुला पूर्णपणे विना शिक्षेचे मी सोडणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर म्हणतो, तू, माझ्या सेवका, याकोबा घाबरु नकोस. कारण मी तुजबरोबर आहे, ज्या राष्ट्रांमध्ये मी तुला विखरले आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन. पण मी तुझा पूर्ण नाश करणार नाही. तरी मी तुला न्यायाने शिक्षा करीन आणि तुला अगदीच शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”