Jeremiah 46:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे मी काय पाहतो? ते सैन्य भयभीत झाले आहे, सैनिक दूर पळून जात आहेत त्यांच्या शूर वीरांचा पराभव झाला आहे. ते घाईने पळून जात आहेत. ते मागे वळून पाहत नाहीत. सगळीकडे धोका आहे.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या दृष्टीस हे का पडत आहे? ते दहशत बसली म्हणून मागे फिरले आहेत. त्यांचे वीर पराभूत झाले आहेत, ते पळ काढत आहेत, मागे पाहत नाहीत; चोहोकडे भीतीच भीती आहे, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी हे काय पाहात आहे? ते भयभीत झालेले आहेत, ते माघार घेत आहेत, त्यांचे योद्धे पराजित झाले आहेत. मागे वळूनदेखील न पाहता ते घाईघाईत पळत आहेत, आणि सर्वत्र आतंक पसरला आहे,” याहवेह जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे मी काय पाहतो? ते भयभीत झाले आहेत आणि दूर पळत आहेत, कारण त्यांच्या सैनिकांचा पराभव झाला आहे. ते संरक्षणासाठी पळत आहेत आणि मागे वळून पाहत नाहीत. असे परमेश्वर म्हणतो.