Jeremiah 46:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिसर येत आहे. प्रचंड, वेगवान नदीप्रमाणे तो येत आहे. मिसर म्हणतो, ‘मी येऊन पृथ्वीला व्यापून टाकीन. मी शहरे व त्यात राहणाऱ्या लोकांचा नाश करीन.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नील नदीप्रमाणे मिसर उसळत आहे; त्याचे जल नद्यांप्रमाणे उसळत आहे; तो म्हणतो, मी चढाई करून जाईन, मी पृथ्वी व्यापून टाकीन; मी नगराचा व त्यातील रहिवाशांचा नाश करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इजिप्त नाईल नदीसारखी उभारून येत आहे, पाण्याने उफाळणार्‍या नदीसारखी. ती म्हणते, ‘मी उभारेन व पृथ्वी व्यापून टाकेन; मी नगरांना व त्यांच्या लोकांना नष्ट करेन.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिसर येत आहे आणि त्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे. तो म्हणतो, मी वर जाईन; मी पृथ्वी व्यापून टाकीन. मी नगरे व त्यामध्ये राहणाऱ्यांचा नाश करीन.