Jeremiah 47:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गज्जाचे लोक दु:खी होतील आणि आपले मुंडन करतील. अष्कलोनचे लोक शांत होतील. दरीतील वाचलेल्या लोकांनो तुम्ही कीती काळ स्वत:ला जखमा करणार?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गज्जाचे वपन झाले आहे; त्यांच्या खोर्यांतले उरलेले अष्कलोन नष्ट झाले आहे; तू कोठवर आपणास जखमा करून घेशील?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गाझा विलापाचे चिन्ह म्हणून आपले मुंडण करेल; अष्कलोन पूर्णपणे निःशब्द होईल. अहो तुम्ही घाटातील अवशिष्ट लोकहो, तुम्ही केव्हापर्यंत स्वतःच्या देहास जखमी कराल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गज्जाला टक्कल पडले आहे. त्यांच्या खोऱ्यातील उरलेले अष्कलोनाचे लोक शांत झाले आहेत. तुम्ही कोठवर शोकाने आपल्या स्वत:ला जखमा करून घेणार?