Jeremiah 48:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग दैवत कमोश याची मवाबच्या लोकांना लाज वाटेल इस्राएलच्या लोकांनी बेथेल येथील दैवतांवर भिस्त ठेवली आणि त्याने त्यांना काहीच मदत केली नाही. म्हणून ते खजील झाले मवाबचेही तसेच होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्याच्यासंबंधाने इस्राएल फजीत झाला तसा मवाब कमोशासंबंधाने फजीत होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलने बेथेल येथे भरवसा ठेवला, व मग त्यांना जशी आपल्या वासराच्या मूर्तीची लाज वाटली. तशीच मोआबाला आपल्या कमोशाची लाज वाटेल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग जसे इस्राएलाचे घराणे आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्यासंबंधी लज्जित झाला तसा मवाब कमोशाविषयी लज्जित होईल.