Jeremiah 48:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुन्हा कधीही मवाबची स्तुती ऐकू येणार नाही. हेशबोनमधील लोक मवाबच्या पाडावाचा बेत आखतील ते म्हणतील, ‘या, आपण त्या देशाचा शेवट करु या.’ मदमेना, तू सुद्धा शांत होशील, तलवार तुझा पाठलाग करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मवाबकन्येची कीर्ती नाहीशी झाली आहे. हेशबोनात तिच्याविरुद्ध कट करीत आहेत: ते म्हणतात, ‘चला, आपण तिचे राष्ट्रत्व मोडून टाकू.’ हे मदमेना, तू सामसूम होशील; तुझ्यामागे तलवार लागेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता यापुढे मोआबाची कोणीही प्रंशसा करणार नाही; हेशबोनमधील लोक तिच्या अधःपतनाचा कट रचतील: ते म्हणतील, ‘चला, आपण त्या राष्ट्राचा अंत करू.’ तुम्ही मदमेनमधील लोकही निःशब्द केले जातील; तलवार तुमचा पाठलाग करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मवाबाचा आदर राहिला नाही. हेशबोनात त्यांच्या शत्रूने तिच्याविरूद्ध अनिष्ट योजिले आहे. ते म्हणाले, ‘या व आपण तिचा राष्ट्राप्रमाणे नाश करू.’ मदमेनासुद्धा नाश होईल, तलवार तुझ्या पाठीस लागेल.